लंघनातला आहार (Fasting  Diet)

 आयुर्वेदामध्ये वर्णीत चिकित्सेच्या षड-उपक्रमांमधील सर्वात पहिला उपक्रम म्हणजे लंघन. लंघन हा शब्दच मुळी लघुया शब्दापासून उत्पन्न झालेला. शरीरांतर्गत दोषांचे पाचन करून शरीरामध्ये लाघव उत्पन्न करणे हा लंघनाचा मूलभूत उद्देश. लंघनाचे सुद्धा दहा प्रकार वर्णन केलेले आहेत त्यापैकी एक प्रकार म्हणजे पाच द्रव्य द्वारे केलेले लंघन. मध्यमबलाच्या व्याधींमध्ये जेव्हा दोष हे मध्यम प्रमाणामध्ये प्रकुपित झालेले असतात तेव्हा आपण ‘पाचन हा लंघनाचा प्रकार मुख्यतः अवलंबितो. याशिवाय कफपित्तात्मक व्याधींमध्ये सुद्धा आपण पाचनद्रव्यांद्वारे लंघन देतो. र्दी, अतिसार, विसूचिका, हृदय रोग, मलविबंध, ज्वर, शरीर-गौरव, उदर-गौरव, हृल्हास, रुची, यांसारख्या व्याधींमध्ये मुख्यतः आपण पाचन प्रकारांनी लंघन देतो. ही पाचनद्रव्य मुख्यतः कटू तिक्त रसात्मक, लघु, उष्णवीर्य या गुणधर्मांची असतात.

पाचनद्रव्ये ही औषधी आणि आहार या दोन्ही स्वरूपाची असतात गुडूची, त्रिफळा, मुस्ता, चित्र, सुंठी इ. औषधी द्रव्य वापरून तयार केलेले विविध पाचकयोग उपलब्ध आहेत. या औषधिंद्वारे पाचन रूपी लंघन करत असताना यांना शरीरात दोषांच्या पाचना सोबतच आहाराचे सुद्धा पाचन करावे लागते. त्यामुळे त्या रुग्णाची प्रकृती, आहार आणि पचनासाठी उपयोगात आणलेले औषधी योग यांच्या एकत्रित परिणामा वरच पाचन/लंघन अवलंबून असते. याउलट आहार द्रव्यांचा उपयोग जेव्हा आपण पाचनासाठी करतो तेव्हा दोष आणि आहारपचन हे दोन्ही उद्देश साध्य करता येतात आणि पाचनतंत्रावर कुठलाही भार येऊ देता शरीराला चयापचयासाठी आवश्यक ऊर्जा सुद्धा उपलब्ध होते.

श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद प्रस्तुत आयुहार मधील ब्रम्हपेया आणि ब्रह्मयू यांचा यशस्वी उपयोग आपण लंघनरूपी पाचनीय आहार्य द्रव्य म्हणून निश्चितच करू शकतो.

ब्रह्मपेया ही रक्तशाली तांदुळापासून निर्मित शुंठी, धान्यक आणि सैंधव युक्त पचनाला अत्यंत हलकी व शारीरिक दोषांचे योग्य पाचन करणारी आहे. हलक्या कर्बोदकांनी (कार्बोहायद्रेट) युक्त ब्रह्मपेया शारीरिक अग्नीचे दीपन करून आहाराच्या चनासोबत शरीराच्या चयापचय क्रियेसाठी आवश्यक ऊर्जा (मेटाबोलिक एनेर्जी) निर्मिती सुद्धा करते. र्दी, अतिसार, ज्वर, उदर-गौरव यासारख्या व्याधींमध्ये आहाराच्या ऐवजी ब्रह्मपेयाचे सेवन शरीराला लघुत्व देऊन आवश्यक इलेक्ट्रोलाईट बॅलन्स मेंटेन ठेवण्यास मदत करते. यासारख्या व्याधींमध्ये प्रत्येक अन्नकालाब्रह्मपेया रुपी आहार रुग्णाला पाचनरूपी लंन देण्यास उपयुक्त ठरतो. याशिवाय स्वस्थ व्यक्तीसुद्धा काही अन्नकालामध्ये आहारा ऐवजी ब्रम्हपेया रूपी आहाराचे सेवन करून लंघन घेऊ शकतात.

ब्रह्मयूष हे सुद्धा मुगापासून निर्मित धान्य, जीर, अजवायण, काळेमिरे, लसुन व सैंधव यासारख्या पाचनीय द्रव्यांनी युक्‍त सूप आहे. मूद्ग हे एक विचित्रप्रत्ययारब्ध असणारे द्रव्य आहे म्हणजे मधुर रसात्मक असून सुद्धा ते गुणांनी लघु आणि रुक्ष आहे आणि शरीराचे पोषण करणारे व व शरीराच्या मांसपेशींना बळ देऊन शारीरिक ताकद वाढवणारे आहे. याशिवाय ते शीत आणि ग्राही गुणधर्माचे असून सुद्धा विषादी आहे जे स्त्रोतसांमधील अवरोध दूर करन्यास मदत करते. ‘ब्रह्मयूष’ हे एक प्रथिने (प्रोटिंस) व कर्बोदकांनी (कार्बोहायड्रेट) युक्त आहार्य सूप असून यामध्ये आयरन व पोटॅशियम सुद्धा मुबलक प्रमाणात आहे. 

‘ब्रह्मयूष’ हे दीपन, पाचन व पौष्टिक गुणधर्माचे आहे. श्वास, कासं स्वरभेद यासारख्या व्याधींवर याचा उपयोग चिकित्सेचे सारखाच होतो.  चिकित्सेदरम्यान याचा उपयोग पाचनीय आहार द्रव्यरूपी लंघनासाठी खूपच फायद्याचा ठरतो. इंटरमिजिएट फास्टिंग, एक अन्नकाल रुपी लंघन, तसेच स्थौल्य, प्रमेह यासारख्या व्याधींमध्ये इंटरमिजिएट डायट म्हणून ब्रह्मयूष चा खूपच यशस्वी उपयोग करता येण्यासारखा आहे.

वैद्य. सारंग देशपांडे

एम.डी. (आयुर्वेद) Ph.D (Sch)

#Langhan #Diet in langhan #Diet during langhan #Ayurvedic diet in langhan

#Ayurvedic aahar #AyuAahar


Buy BrahmaPeya       

Buy BrahmaYush


 

 

 

 

 

Share this Blog

 

 

 

 

 

 

 

Share blog on whatsapp