वजन कमी करायचय ?
पण खरंच हे आपल्याला वाटत तितके सोप्पं आहे का? नाही, विशेषत: जर आपण वजन कमी करत असताना शांत, प्रसन्न मन आणि निरोगी शरीर राखू इच्छित असाल तर……
वजन कमी करण्याची प्रक्रिया हि हळूहळू असली तरी अत्यंत प्रभावीपणे जर उपाय करायचा असेल तर balanced diet हाच एक पर्याय आहे.
जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर फक्त व्यायामच आपल्याला मदत करू शकेल असे नाही. आहार व्यायामापेक्षा अधिक महत्त्वाचा असू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी पुरेसे पोषक घटक आपल्या आहारात मिळत आहेत कि नाही हे सुनिश्चित करून मगच संपूर्ण डाएट ठरवावा लागेल यामध्ये प्रथिने, कर्बोदके तसेच खनिज आणि जीवनसत्त्वे समाविष्ट असायला हवीत जे आपल्या व्यायामाची क्षमता वाढवूंन, स्नायूंच्या पुनर्प्राप्ती साठी ही मदत करतील व आपल्याला योग्य वजन आणि निरोगी शांत मन राखण्यास मदत करतील .
नुसता वजन कमी करणे हाच एक उद्देश न ठेवता कमी केलेले वजन परत न चढवता ते नेहमी अगदी तुम्हाला पाहिजे तसेच राहील आणि त्याबरोबरच निरोगी जीवनशैलीचा अवलंब, योग्य आहार, तणाव कमी करणे आणि भरपूर द्रवपदार्थ (लिंबू सरबत, वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या फळांचा रस, ताक, सोलकढी आणि महत्वाचा म्हणजे पाणी) सेवन करणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त नुसता शरीरावरील किलोग्रॅम कमी करण्यापेक्षा, आपण तंदुरुस्त,निरोगी आयुष्य जगण्यावर लक्ष केंद्रित केले आहे का हे हि सुनिश्चित करायला हवे.
जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर आपण जीवनशैली बदलण्या व्यतिरिक्त आपल्या आहारात काही गोष्टी देखील जोडल्या पाहिजेत ज्या आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस मदत करतील. आणि अशीच एक गोष्ट म्हणजे बार्ली किंवा यव. बार्ली एक फायबर समृद्ध धान्य आहे जी सामान्यत: तांदुळाला ला पर्याय म्हणून वापरला जातो आणि ओट्स आणि गहू यासारख्या संपूर्ण धान्याच्या श्रेणीमध्ये मोजला जातो. वजन कमी करण्यासाठी बार्ली आपल्याला कशी मदत करू शकते ते आपण आता बघू
बार्लीचे आरोग्य फायदे
बार्ली मध्ये असलेल्या बीटा-ग्लूकन शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते; त्यात कोलेस्टेरॉल-फायटिंग फायबर असतात जे कोलेस्टेरॉलची पातळी कायम ठेवन्यास मदत करते. बार्ली च्या नियमित सेवना मुळं मूत्रमार्गाद्वारे शरीर आणि आतड्यांमधून विष बाहेर टाकण्यास मदत होते . बार्लीचे पाणी मूत्रवर्धक म्हणून देखील कार्य करते. बार्ली ह्या धान्यात भरपूर प्रमाणात फायबर चे प्रमाण असतात. फायबर समृद्ध असल्याने, बार्ली आपले पाचन तंत्र सुधारते, संशोधनातुन असे ही स्पष्ट झाले की बार्लीचे पाणी पचन प्रक्रियेस मदत करते, त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा अतिसार सारख्या इतर समस्या सुधरवून शरीराचे आरोग्य राखण्यास मदत होते .
वजन कमी करण्यासाठी उपयोगी बार्लीचे सूप
1. जंकफूडला बाय -बाय:
बार्ली हे एक असं धान्य आहे कि ज्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर समाविष्ट आहेत, ह्या फायबर मुळं पोट जास्त वेळ भरलेला आपल्याला जाणवत आणि तृप्त पोट म्हणजेच अबर-चबर खान कमी, पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूड ला बाय बाय करण्यासाठी बार्ली हे उत्तम आहे आणि जर जंक फूड कमी अथवा नाही तर तुम्ही वजन कमी करण्याच्या बाबतीत एक खूप मोठा पाऊल उचलला आहे असं म्हणायला हरकत नाही. तृप्त पोट हे सुनिश्चित करते की आपण मूर्खपणाच्या आहारामध्ये भाग घेत नाही.
2. उत्तम पचनशक्ती:
बार्ली हे बीटा-ग्लुकॅन फायबरनी अतिशय समृद्ध धान्य आहे, जर तुम्ही बार्ली हे सूप च्या रूपात घेतला तर बार्ली मधले हे फायबर खात्रीपूर्वक तुमच्या आतड्यांच्या हालचाली अगदी सुरळीत ठेऊन पोट साफ करण्यास मदत करतात, आयुर्वेद नुसार बार्ली हे खूप शक्तिवर्धक आहे, ह्यामुळे उत्तम पचनाला तर मदत होतेच पण त्याचबरोबर जर कांही पोटाचे विकार असतील तर ते हि बार्ली मुळं कमी होण्यास मदतच होते.
3. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती:
बार्ली हे पोषण तत्वाने परिपूर्ण असं अन्न आहे, त्यापैकी महत्वाचा एक म्हणजे लोह जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून सुस्ती आणि थकवा कमी करतो. बार्ली मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स ही असतात जे कि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात त्यामुळे सर्दी, कफ, खोकला आणि ताप सारख्या सामान्य संक्रमणांना दूर ठेवण्यास मदत होते. ही बार्ली किडनीला ही उत्तम प्रकारे कार्य करण्यास मदत करते. शरीरातील पेशींच्या निरोगी विकासास मदत देणारी म्हणून देखील ओळखले जाते.
4. कमी कॅलरी:
बार्ली शरीरात विषारी पदार्थ वाहून आतडे स्वच्छ करतात जे केवळ वजन कमी करण्यासच नव्हे तर आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी बार्ली सूप ची शिफारस केली जाते कारण ते वजन कमी करण्यास मदत करतात लो ग्लाइसेमिक इंडेक्सच्या गुणधर्मांमुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करतात आणि अतिरिक्त कॅलरीज देखील निर्माण होत नाहीत.
या सर्व कारणांमुळे, बार्ली वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट मानली जाते आणि म्हणूनच, आयुर्वेद आणि आहार तज्ज्ञांकडून नियमितपणे बार्लीचे सेवन आपल्या आहारात असू द्या अशी शिफारस केली जाते. “श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद” द्वारा सुरु असलेल्या उपक्रम अंतर्गत सुरु असलेल्या जगातील पहिला आयुर्वेदिक खाद्य ब्रँड "आयु-आहार" स्थापित केला. यात आयुर्वेदिक यूष, मंड, पेया, विलेपी आणि ब्रह्मरक्षा आयुर्वेदिक सुपर हेल्थ ड्रिंक उत्पादनांची निर्मिती केली गेली आहे त्यामुळे वास्तविक आयुर्वेद आहाराचे योग्य पालन केले जाते.
"आयु-आहार" द्वारा प्रस्तुत “ब्रह्मसतु“-जे बार्ली (यव) पासून बनवण्यात आले असून हे प्रामुख्याने संतर्पणजन्य रोगांमध्ये वापरले जातात. हे लठ्ठपणा, प्रमेह आणि पीसीओडी सारख्या विकारांमध्ये एक अतिशय प्रभावी आहार आहे. ब्रह्मसत्तू उत्साही, क्लेदहर आणि मेदोहर आहे, यात फायबरचे प्रमाण जास्त आहे, चरबी कमी आहे, व्हिटॅमिन बी मुबलक आहे आणि कॅल्शियम, लोह, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम, फोलेट यासारखे बरेच पोषक घटक आहेत.
ब्रह्मसत्तू पाचक आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करणारे सूप आहे ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हे फायबर, विविध जीवनसत्त्वे, पोषक आणि खनिजे यांनी समृद्ध आहे. म्हणूच वजन कमी करायच्या प्रक्रियेत निश्चिन्तपणे “ब्रह्मसतु “ तुम्हाला खूप मोठी मदत करू शकेल.
रश्मी अयाचित गुरुग्राम (India)
Buy Authentic Ayurvedic Barley Product
Share this blog