सिद्धब्रह्म रक्षा किट

सध्याच्या परिस्थितीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी

1. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करणे

2. इम्युनिटी वाढविणारी औषधे घेणे आणि

3. हलका सुपाच्य पण तरीही पौष्टिक आहार घेणे

हेच पर्याय उपयुक्त ठरू शकतात. ह्यासाठी अनेक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्यांनी त्यांच्या कित्येक वर्षांच्या चिकित्सेतील अनुभव आणि मागील एक वर्षातील कोरोना पेशंट मधील अनुभव यांचा विचार करून एकत्र येऊन "सिद्धब्रह्म रक्षा-किट" या नावाने एक इम्युनिटी किट निर्माण केली आहे.

किट मधील घटक व त्यांची वैशिष्ट्ये

1.सिद्धब्रम्ह कषाय चूर्ण (काढा):

आयुर्वेदानुसार न पचलेल्या अन्नापासून आम निर्मिती होते व हाच "आम" सर्व रोगांच्या मुळाशी आढळतो. कोरोना मध्येदेखील ज्वर, श्वास ,कास, भूक न लागणे इत्यादी लक्षणे आढळतात व त्यामागे शरीरातील अग्निमांद्य कारणीभूत ठरते. त्यामुळे अग्नीवर्धनासाठी आणि आम पाचनासाठी ज्वर चिकित्सेतील धातू पाचक योग, मुख्यतः रस आणि रक्त पाचक औषधींचा योग्य प्रमाणात वापर करून सिद्धब्रह्म कषाय चूर्ण बनविण्यात आले आहे.

2. सिद्धब्रह्म गंडूष चूर्ण (gargles):

कोरोना विषाणूचा नाक व घशाच्या ठिकाणी नाश करून त्याचा श्वास नलिका व फुफ्फुसांत पर्यंत होणारा प्रसार रोखण्यासाठी नियमित गंडूष करणे उपयुक्त ठरते. ह्यामधील हरिद्रा, त्रिफळा इत्यादी घटक त्यांच्या जंतुनाशक व कषाय या गुणधर्मामुळे अत्यंत उपयोगी पडते जिभेला चव नसणे यावरही याचा उपयोग होतो.

3. ब्रह्मयुष (Green gram soup):

आम पचनासाठी, भूक वाढीसाठी, अग्नि संरक्षणासाठी हलका सुपाच्य पण तरीही पौष्टिक आहार महत्त्वाचा ठरतो. ब्रह्मयुष मधील मूग, सैंधव, काळे मिरे, अजवायण, लसुन इत्यादी घटक द्रव्यामुळे वरील गोष्टी पूर्ण होतात अन्नाची रुची उत्पन्न होऊन अशक्तपणा दूर होण्यासही मदत होते

4. Flucog tablets:  

महासुदर्शन घन, सितोपलादी चूर्ण, गोदन्ती भस्म, हे प्राणवहस्रोतसावर कार्य करणारेज्वरघ्न द्रव्य यात आहेत त्यामुळे सर्दी, ताप, अंगदुखी, वास न येणे, दम लागणे इत्यादी लक्षणांमध्ये ही उपयुक्त ठरते. 

5. ब्रह्मरक्षा (super health drink):

अश्वगंधा, शतावरी, ब्राम्ही त्यादी घटक द्रव्यांनी युक्‍त असे ब्रह्मरक्षा रोगप्रतिकारक शक्ती वाढविते, स्नायू व मांसपेशींना बळकटी देते तसेच शारीरिक व मानसिक ताण दूर करते.

अशाप्रकारे वरील पाचही घटक द्रव्यांचा कीट मध्ये समावेश आहे. स्वस्थ व्यक्तींनी किंवा mild to moderate स्वरूपात कोरोना झालेल्या व्यक्तींनी या किटचा अवलंब करावा ह्या किट द्वारे मुख्यतः अग्नीचे संरक्षण होते पर्यायाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे स्वस्थ व्यक्तीने पाच दिवसांची एक किट महिन्यातून एकदा वापरावी आणि कोरोना झालेल्या .रुग्णांनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार या किटचा वापर करावा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी देखील या किटचा वापर कोरोना पच्छात येणारा, थकवा, हलका कास, अंगदुखी, अम्लपित्त इत्यादी दूर होण्यासाठी करावा.

 

-- वैद्य. सायली जोगळेकर-जोशी, एम. डी. (आयुर्वेद)

    डायरेक्टर, सायंटिफिक सर्विसेस

    श्री ब्रह्मचैतन्य आयुर्वेद, नागपुर

 


Buy SiddhaBrahma Raksha-Kit


 

 

 

Share this blog

Share blog on whatsapp

Join our newsletter. Get info on the latest updates.


© 2025,Copyrights Brahmachaitanya. All Rights Reserved

This site is managed by Dr. Shrikant Hadole
E-commerce Application Development