कोरोना आणि सामान्य पथ्यापथ्य (dos and  donts)

लक्षणे नसताना किंवा सौम्य ( अल्प ) लक्षणे असताना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर कॉम्प्लिकेशन होण्याची कारणे

घरगुती उपाय

अतिप्रमाणात पाणी घेणे

गरम पाणी

नाकात लिंबू पिळणे

लिंबू मीठ हळदीच्या गुळण्या करणे

अतिप्रमाणात वाफ घेणे

फळांचे ज्यूस पिणे

नारळ पाणी पिणे

ड्राय फ्रूटचे ज्यूस किंवा अतिसेवन

दूध, दही ,ताक ,पनीर खाणे

अंडी खाणे

कडधान्य अति प्रमाणात खाणे

अतिप्रमाणात मटण चिकन खाणे किंवा सूप घेणे

एका जागेवर बसून असा सर्व आहार करणे ( व्यायामाचा अभाव )

कधीही झोपणे ( रात्री जागरण ,सकाळी उशिरा उठणे ,दुपारी झोप )

भीती

कोरोना संबंधित यु ट्यूब उपचार पाहणे व करणे

घरगुती आयुर्वेदिक इलाज जसे तुलसी काढा, गुळवेल काढा ,जेष्ठमध काढाअडुळसा काढा )

मनाने आयुर्वेदिक औषधे घेणे जसे (महासुदर्शन काढा, लक्ष्मी विलास, श्वासकासचिंतामणी, सितोपलादी चूर्ण )

मनाने निसर्गोपचार (गोमूत्र अर्क )

मनाने ऑलोपॅथी औषधे (व्हिटॅमिन सी, मल्टि विट्यामिन, अँटीबीओटीक, स्टीरॉईड, इकॉस्प्रिन ,)

मनाने होमिओपॅथी औषधे (Aspidosperma )

४ ऑलोपॅथी, ४ आयुर्वेद, ४ होमिओपॅथी, ४ निसर्गोपचार, ४ स्वयंघोषित कोरोना तज्ञाच्या सल्ल्याने औषधे

एका डॉक्टर ची औषधे चालू असताना अनेक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे

 

लक्षणे नसताना किंवा सौम्य लक्षणे असताना काय करावे

डोकं शांत ठेवावे

आपल्याला कोणत्या पद्धतीचा उपचार घ्यायचा आहे ते ठरवावे ऑलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओ पॅथी, निसर्गोपचार

यापैकी तुम्ही कोणत्याही एक किंवा दोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व तो व्यवस्थित ते जसे सांगतील तसे पालन करावे (औषधे ते देतील तेवढीच घ्यावी) मनाने कोणतेही औषध घेऊ नये.  

डॉक्टरांच्या व्यवस्थित संपर्कात राहावे, डॉक्टर सांगतील तेव्हढ्याच तपासण्या करून घ्याव्या मनाने काहीही करू नये

 

आहार:

 

सकाळी भूक असल्यास भाजी (फळभाजी )  , पोळी चमचाभर तूप ( भुकेपेक्षा दोन घास कमीच ) १ घास ३२ वेळा चावून खाणे दर घासाला उकळून ठेवलेले पाणी घ्यावे ,

दुपारी भूक असल्यास डाळभात ,

५ वाजता भूक असल्यास २० काळे मनुके चघळून खाणे,

रात्री भाजी (फळभाजी ) भाकरी ,

पातळ पदार्थ म्हणून : तांदळाची पेज, मुगाचे कढण, हुलग्याचं माडगं, फळभाज्यांच सूप, धने, जिरे, हिंग, लसूण, आले, तूप, सैंधव मीठ, भूक असेल तर घेणे .

हलका व्यायाम : सूर्यनमस्कार, सांध्यांच्या हालचाली, कवायती, योगासने, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम

झोप: फक्त रात्री झोपावे, दुपारी झोपू नये, सकाळी उशिरा उठू नये

मोबाईल किंवा टीव्हीवर चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, गाणी, खेळ, पिक्चर या व्यतिरिक्त काहीही पाहू नये

 

 

 

--- वैद्य निलेश लोंढ़े एम ड़ी  आयुर्वेद

     निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल भोसरी पुणे

 


II स्वस्थ रहा मस्त रहा II


 

 

 

Share this blog

 

Share blog on whatsapp

Join our newsletter. Get info on the latest updates.


© 2025,Copyrights Brahmachaitanya. All Rights Reserved

This site is managed by Dr. Shrikant Hadole
E-commerce Application Development